बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranuat) हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. भाजपने तिला उमेदवारी दिल्यापासून ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. अशातच आता कंगनाने एक असं वक्तव्य केलं आहे ज्यामुळे ती वादात सापडली असून मोठ्या प्रमाणाच ट्रोल केलं जात आहे.
2014 मध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला तेव्हा भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले, असे वक्तव्य करत कंगना राणौतने काही वर्षांपूर्वी चांगलीच खळबळ उडवून दिली होती. अशातच आता कंगनाने नुकत्याच केलेल्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा नवा वाद निर्माण केलाआहे. 27 मार्च रोजी कंगनाने तिच्या मूळ गावी मंडी येथून खासदार उमेदवार म्हणून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, तिने एका मीडिया कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे ती वादात सापडली आहे.
सध्या कंगनाच्या या मुलाखतीची एक क्लिप ट्विटर आणि इंस्टाग्रामवर व्हायरल झाली आहे. ज्यात तिने म्हटले आहे की, स्वातंत्र्य सेनानी आणि आझाद हिंद फौजेचे नेते सुभाषचंद्र बोस हे भारताचे पहिले पंतप्रधान होते.
“मला एक गोष्ट सांगा, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस कुठे गेले होते?” जेव्हा शो होस्टने कंगनाला सुभाषचंद्र बोस हे भारताचे पंतप्रधान नसल्याची आठवण करून दिली तेव्हा कंगनाने एक सिद्धांत मांडला. “ते नव्हते, पण का? ते कुठे गेले? त्यांना कसे गायब केले गेले?” यासोबतच अभिनेत्री म्हणाली की, बोस भारताच्या स्वातंत्र्यासाठी जपान आणि जर्मनीविरुद्ध लढले पण त्यांना भारतात उतरू दिले नाही.”
https://twitter.com/DearthOfSid/status/1775913374628430310
सध्या कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच कंगनाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात असून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.