लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. याच्या तारखा देखील जाहीर झाल्या असून, आचारसंहिता देखील लागू झाली आहे. उद्धव ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे वृत्त समोर येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना सांगलीतून उमेदवारी दिली आहे. सांगलीच्या जागेवरून मविआत वाद निर्माण झाला आहे. सध्या खासदार संजय राऊत हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्याचवेळी ही जागा काँग्रेसला सुटत नसल्याने कमालीचे नाराज झालेले आमदार विश्वजित कदम हे आणि विशाल पाटील हे खासगी विमानाने तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
सांगलीची जागा काँग्रेसचीच आहे आणि ती काँग्रेसलाच मिळाली पाहिजे अशी कठोर भूमिका आमदार विश्वजित कदम यांनी घेतली आहे. मात्र आता विश्वजित कदमांची भूमिका अधिकच तीव्र झालेली पाहायला मिळत आहे. जोपर्यंत सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नाही तोपर्यंत काँग्रेसच्या कोणत्याही बैठकीला जाणार असल्याची टोकाची भूमिका विश्वजित कदमांनी घेतली आहे. आमदार कदमांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना एक पत्र लिहिले आहे. सांगलीच्या जागेबाबत आमच्या भावना तुम्ही जाणता , त्यामुळे तिढा सूटत नाही तोवर काँग्रेसच्या कोणत्याही बैठकीला हजर राहणार नसल्याचे कदमांनी स्पष्ट केले आहे.
सांगली लोकसभेच्या जागेवरून मविआतील ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात तणाव आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान यावरून काँग्रेस नाराज झाल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली. ठाकरेंनी सांगलीमध्ये एकतर्फी उमेदवारी जाहीर करून केल्याने अडचण निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये हे होईल नको. एकीकडे चर्चा सुरु असताना उमेदवार जाहीर करायला नको होता. ठाकरेंनी अशाप्रकारे उमेदवार जाहीर करणे योग्य नसल्याचे नाना पटोले म्हणाले.