आयपीएलच्या १७ व्या स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली आहे. प्रत्येक सामना हा रंगतदार आणि रोमहर्षक झालेला दिसून येतोय. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना रंगणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत राजस्थान रॉयल्स संघ अजिंक्य राहिला आहे. कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वात संघाने तीनही सामन्यात विजय मिळविला आहे. तर दुसऱ्या बाजूला फाफ डू प्लेसिस कर्णधार असलेली रॊयल चॅलेंजर्स बंगलोर ४ पैकी केवळ १ सामना जिंकू शकली आहे. त्यामुळे बंगलोरपुढे विजय प्राप्त करणे आवश्यक झाल्याचे दिसते आहे.
राजस्थान विरुद्ध बंगलोर हा सामना जयपूर येथे खेळवला जाणार आहे. राजस्थान संघ आपली विजयाची मालिका कायम राखण्यासाठी तर बंगलोरच संघ पराभवाची मालिका संपवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. उद्याचा सामना हा ७.३० वाजता सुरु होणार आहे. दरम्यान उद्याचा सामना तुम्ही जिओसिनेमावर मोफत पाहू शकणार आहात.
राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन, (कर्णधार) जॉटॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोव्हमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, आर अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि तनुष कोटियन, स बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), यश दयाल, मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल विल लोमर, जॅक्स, कॅमेरॉन ग्रीन, टॉम कुरन, मनोज भंडागे, आकाश दीप, रजत पाटीदार, विराट कोहली, दिनेश कार्तिक, सौरव चौहान आणि अनुज रावत, विजयकुमार विशक, रीस टोपले, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, राजन कुमार.