छत्तीसगड काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चरणदास महंत यांच्यावर एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ‘आक्षेपार्ह’ टिप्पणी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल म्हणजे शुक्रवारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर राजनांदगाव शहरातील कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये याबाबत एफआयआर नोंदवण्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले.2 एप्रिल रोजी येथे एका सार्वजनिक रॅलीत कथित वक्तव्य केल्याबद्दल महंत यांच्यावर आयपीसीच्या कलम 506 (गुन्हेगारी धमकी)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे अधिकाऱ्याने सांगितले.
काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांपैकी एक असलेले चरणदास महंत यांनी मंगळवारी राजनांदगाव येथील जाहीर सभेत वादाला तोंड फोडले, तिथे त्यांनी असे म्हंटले होते की, त्यांना काठीने पंतप्रधान मोदींचा सामना करू शकेल अशा व्यक्तीची गरज आहे. स्थानिक भाषेत आपल्या भाषणादरम्यान, महंत यांनी जनतेला त्यांच्या भविष्यातील कल्याणासाठी माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या यशाची खात्री करण्याचे आवाहन केले.
भाजप खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पंतप्रधान मोदींविरुद्ध महंत यांच्या वादग्रस्त टिप्पणीनंतर काँग्रेसवर टीका केली आणि “पंतप्रधान मोदींबद्दल लोकांचे प्रेम आणि समर्थन वाढत असल्याने काँग्रेसने मानसिक संतुलन गमावले” असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “लोकांकडून होणारा विरोध आणि पंतप्रधान मोदींबद्दल सतत वाढत जाणारा पाठिंबा आणि आपुलकी पाहता, विरोधी पक्षनेत्यांनी, प्रामुख्याने काँग्रेसचे, त्यांचे मानसिक संतुलन गमावलेले दिसते. छत्तीसगड एलओपीने पुन्हा एकदा पंतप्रधानांसाठी अपमानास्पद भाषा वापरली आहे. असे त्रिवेदी म्हंटले आहेत.
“अशी भाषा लोकशाहीत खेदजनक आहे… मला विचारायचे आहे की, ‘ये मोहब्बत की दुकां से कौन से फरमान है?’. असे म्हणत काँग्रेस गांधींच्या परंपरेतील असल्याचा दावा करते, आणि अशी अपमानास्पद विधाने वारंवार करते आणि हे सर्व 2014 च्या निवडणुकीपासून घडत आहे,” असे त्रिवेदी यांनी म्हंटले आहे.
छत्तीसगडमधील 11 लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल, 26 आणि 7 मे रोजी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.छत्तीसगडमध्ये बालेकिल्ला असलेल्या भाजपने 2019 च्या लोकसभेत 9 जागा जिंकल्या, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) फक्त 2 जागांवर मर्यादित राहिली.तर 2014 च्या निवडणुकीत भाजपने 10 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला फक्त एक जागा जिंकता आली होती.