आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) ही देशातील प्रमुख बँक आहे. देशातील कोणत्याही बँकेने नियमांचे पालन न केल्यास, आरबीआय त्यांच्यावर कठोर कारवाई करते. देशातील बँक, वित्तीय संस्था, शासकीय संस्था यांच्यावर आरबीआयची करडी नजर असते. देशातील कोणत्याही बँकेने नियमांचे पालन न केल्यास आरबीआय कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. दरम्यान आरबीआयने IDFC FIRST बँकेवर मोठी कारवाई केली आहे. या बँकेसह एलआयसी हौसिंग फायनान्सवर देखील कारवाई केली आहे. यामुळे आता ग्राहकांवर काय परिणाम होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आरबीआयने आयडीएफसी फर्स्ट बँकेला एक कोटी दंड ठोठावला आहे. यासह आरबीआयने एलआयसी हौसिंग फायनान्सला देखील ४९.७० लाखाचा दंड ठोठावला आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याने आणि बंधने न पाळल्यामुले हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आरबीआयने माहिती दिली आहे. याआधी आरबीआयने एसबीआय आणि एचडीएफसी बँकेवरही अशा प्रकारची कारवाई केली होती. आयडीएफसी फस्ट बँकेला थेट एक कोटी रुपयांचा दंड थोपटण्यात आल्यामुळे या बँकेच्या ग्राहकांनाही आर्थिक फटका बसणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत.