आयपीएलच्या १७ व्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. मात्र यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. दिल्ली आणि मुंबई संघांची अवस्था सध्या एकसारखीच आहेत. दिल्लीने एकूण सामन्यात एक विजय प्राप्त केला आहे. तर, मुंबईने आपले पहिले तीनही सामने गमावले आहेत. उद्या मुंबई आणि दिल्ली यांच्यात सामना होणार आहे. मात्र त्याआधीच दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. एक स्टार खेळाडू उद्याच्या सामन्यात खेळणार नाहीये. यामुळे दिल्लीच्या चिंतेत वाढ झाली आहे.
उद्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांसाठी उद्याचा सामना हा त्यांत महत्वाचे मानले जात आहे. सूर्यकुमार यादव संघात परत आल्याने मुंबईला थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र दिल्लीचा हुकुमी गोलंदाज कुलदीप यादव उद्याच्या सामन्यात खेळणार नसल्याचे समजते आहे. कुलदीप यादव दुखापतग्रस्त आहे.
कुलदीप यादव हा कंबरदुखीने त्रस्त आहे. त्यामुळे डॉक्टरांनी कुलदीपला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मागच्या कोलकाता नाईट रायडर्सच्या विरुद्ध सामन्यात कुलदीप खेळला नव्हता. कुलदीप फिटनेससाठी राष्ट्रीय अकादमीत जाण्याची शक्यता आहे. तिथे त्याला फिटनेस सर्टिफिकेट मिळेल की तो पुढील आयपीएल सामने खेळू शकणार आहे.