लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. २०२४ ची निवडणूक एनडीए विरुद्ध इंडी आघाडी अशी होणार आहे. इंडी आघाडीने भाजपाचे सरकार पुन्हा येऊ नये म्हणून प्रचार करताना दिसत आहे. तर, तिसऱ्यांदा केंद्रात सरकार येण्याच्या दृष्टीने प्रचार करत आहे. दरम्यान काँग्रेसच्या नेत्या आणि माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपावर टीका केली आहे. संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सोनिया गांधी हे जयपूरमध्ये बोलत होते.
राजकीय सत्तेचा वापर करून लोकशाही संस्था उद्ध्वस्त केल्या जात आहेत, असे सोनिया गांधी निवडणूक सभेत म्हणाल्या. ते म्हणाले की, संपूर्ण यंत्रणेत भीती निर्माण केली जात आहे. ही एक प्रकारची हुकूमशाही असून, या हुकूमशाहीला आम्ही सगळे मिळून विरोध करून करू. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी शनिवारी जयपूरमध्ये पक्षाचा निवडणूक जाहीरनामा जाहीरपणे जाहीर करण्यासाठी रॅली काढली. काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा ‘न्यायाच्या पाच स्तंभांवर’ केंद्रित आहे.
यंदाची निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर एनडीए सरकारकडून लढविली जाणार आहे. तर विरोधक हे सरकारी यंत्रणांचा होत असलेला गैरवापर, महागाई, बेरोजगारी अशा विरोधात लढणार आहेत. एनडीए ने अब की बार ४०० पार तर भाजपाने ३७० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. देशात ७ टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून, ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.