लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने शिरूर मध्ये मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली आहे. तसेच शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव पाटील आणि मंगलदास बांदल यांच्यात लढत होणार होती. मात्र आता वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीने बारामतीमध्ये जो निर्णय घेतला होता, त्याविरोधात मंगलदास बांदल गेल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
काल इंदापूरमध्ये भाजपचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मेळाव्याआधी मंगलदास बांदल यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट फहेतली होती. बारामतीमध्ये वंचित बहुजन आघाडीने सुप्रिया सुळेंना पाठिंबा देण्याचे जाहीर केलं होते. तरी मंगलदास बांदल यांनी फडणवीसांची भेट घेतल्याने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत २५ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापैकी चार उमेदवार बदलण्यात आले आहेत. रामटेकमध्ये वंचितकडून यापूर्वी शंकर चहांदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र नंतर त्या ठिकाणी काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. आतासुद्धा देवेंद्र फडणवीसांची भेट घेणे मंगलदास बांदल यांना भोवल्याचे पाहायला मिळत आहे.