भारत देश आपल्या देशात तयार झालेली उत्पादने निर्यात देखील करत असतो. सर्व देशांमध्ये निर्यात-आयात सुरूच असते. या माध्यमातून देशाचा व्यापार सुरु असतो. याच अंतर्गत भारताने मालदीवला मदतीचा हात पुढे केला आहे. भारत मालदीवला काही गोष्टी निर्यात करणार आहे. भारत मालदीवला गहू, तांदूळ, साखर निर्यात करणार आहे. मालदीव सरकारने जीवनाश्यक वस्तू पाठविण्याची विनंती भारत सरकारकडे केली होती. त्यानुसार आता मालदीवला मदत करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
भारत आणि मालदीव देशांमध्ये एक करार झाला आहे. या कराराच्या माध्यमातून भारत मालदीवला जीवनाश्यक वस्तूंची निर्यात करणार आहे. यामध्ये गहू, तांदूळ , साखर आणि कांदा यांचा समावेश आहे. या सर्व वस्तूंच्या निर्यातीवर सरकारने बंदी घातलेली असून, देखील भारत सरकार मालदीवला मदत करणार आहे. या माध्यमातून भारत आणि मालदीव यांच्यातील व्यापार वाढण्यास मदत होणार आहे. तसेच या व्यापारातून मोठ्या प्रमाणात उलाढाल होणार आहे. मालदीव सरकारने भारताला जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची मदत करण्याची विनंती केली होती. दरम्यान, भारत हा साखर, तांदूळ आणि कांद्याचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात देशातून या वस्तूंची परदेशात निर्यात केली जाते. अनेक शेजारील देश भारतावर अवलंबून आहेत.