पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी (6 एप्रिल) सहारनपूरमध्ये (Saharanpur) जाहीर सभेला संबोधित केले. पीएम मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात राम-रामने केली. यानंतर त्यांनी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मोदी म्हणजे 2047 पर्यंत फक्त 24×7 काम. माझा प्रत्येक क्षण देशाच्या नावावर आहे, माझा प्रत्येक क्षण कामाच्या नावावर आहे. तसंच पीएम मोदी असेही म्हणाले की, आतापर्यंत तुम्ही फक्त ट्रेलर पाहिला आहे.
दहा वर्षांत बरीच कामे झाल्याचे लोक सांगतात. मोदींच्या मनात असलेल्या स्वप्नानुसार हे काम केवळ ट्रेलर आहे. अजून खूप काही करायचे आहे. देशाला खूप पुढे न्यायचे आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. खाद्यतेल आणि डाळींमध्येही स्वयंपूर्णता येईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारतात बनवलेल्या वस्तू जगाच्या कानाकोपऱ्यात आपला ठसा उमटवतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. एवढ्या मोठ्या संकल्पासाठी मोदींची हमी पूर्ण करण्यासाठी मोदींना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तसंच सहारनपूरमधील आमचे सहकारी राघव लखन पाल आणि कैराना येथील सहकारी प्रदीप चौधरी यांना प्रचंड मतांनी विजयी करून संसदेत मला पाठिंबा देण्यासाठी पाठवायचे आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.