महिंद्रा उद्योगसमूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ते ट्विटरवर नेहमी काहीना काही व्हिडीओ पोस्ट करत असतात. तसंच ते बहुतेक लोकांचं कौतुक करताना देखील दिसतात. ते सोशल मीडियावर लोकांसाठी कधी प्रेरणादायी गोष्टी तर कधी मजेशीर व्हिडीओ पोस्ट करत असतात. त्यामुळे आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात, तसंच त्यांचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहे.
बऱ्याचदा आनंद महिंद्रा हे बहुतेक लोकांचं किंवा त्यांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक करताना दिसतात. तसेच बहुतेकांच्या हुशारीवर त्यांनी जॉबची ऑफर देखील दिली आहे. तर आताही आनंद महिंद्रा यांनी 13 वर्षांच्या चिमुकलीला थेट जॉबची ऑफर दिली आहे. चिमुकीलच्या हुशारीवर खुश होत आनंद महिंद्रा यांनी तिला जॉबची ऑफर दिली आहे. पण महिंद्रा यांनी या चिमुकलीला जॉबची ऑफर का दिली? अशा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर आता आपण याबाबत जाणून घेणार आहोत.
तर झालं असं की, उत्तर प्रदेशमध्ये बस्ती जिल्ह्यात 13 वर्षांची निकीता पांडे ही मुलगी राहते. तर निकीता आणि तिची लहाण बहिण घरातील ज्या रूममध्ये होत्या तिथे एक माकडे शिरले. जेव्हा ते माकडे त्यांच्या रूममध्ये शिरले तेव्हा त्याने निकीता आणि तिच्या बहिणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण निकीताने तिच्या बुद्धीचा वापर करत अॅलेक्सा या डिव्हाईसच्या मदतीने माकडाला घरातून पळून लावले.
जेव्हा ते माकड घरात घुसले आणि त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा निकीताने अॅलेक्सा या डिव्हाईसला कुत्र्याप्रमाणे भुंकण्याची सूचना दिली. मग तिची ही सूचना अॅलेक्साने स्विकारली आणि कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज काढला. निकीताची ही युक्ती चांगलीच कामी आली आणि ते माकड घरातून पळून गेले. त्यामुळे निकीता आणि तिच्या बहिणीचा जीव वाचला. निकीताच्या या कामगिरीवर खुश होऊन आनंद महिंद्रा यांनी तिला जॉबची ऑफर दिली आहे.
https://twitter.com/ANINewsUP/status/1776434937174045049
आनंद महिंद्रा यांनी नुकताच 13 वर्षांच्या चिमुकलीचा एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी म्हटलं आहे की,आपण टेक्नॉलॉजीचे गुलाम बनणार की स्वामी होणार? हा सध्याच्या काळातील प्रमुख प्रश्न आहे. या मुलीची गोष्ट आपल्याला दिलासा देत आहे की, टेक्नॉलॉजी नेहमीच ह्युमन टॅलेंटला प्रोत्साहन देणारी असणार. या चिमुकलीची विचारसरणी विलक्षण होती. या मुलीने अप्रत्यक्ष जगात तिची नेतृत्व क्षमता दाखवली आहे. त्यामुळे तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जर तिनं कधी कॉर्पोरेट जगतात काम करण्याचा निर्णय घेतला तर मला आशा आहे की, आम्ही महिंद्रा राईजमध्ये तिला आमच्यात सहभागी होण्यास तयार करू शकू.