नुकतीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील (Pune) एक तरूण अमेरिकेतून बेपत्ता झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा तरूण अचानक बेपत्ता झाल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत पडले आहे.
प्रणव कराड असं अमेरिकेतून बेपत्ता झालेल्या तरूणाचं नाव आहे. प्रणव हा अमेरिकेतील विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करत होता. या कंपनीत तो शिफ्ट डेस्कला काम करत होता. मात्र, अचानक तो बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबीय चिंतेत आहेत. मागील 3 दिवसांपासून प्रणव बेपत्ता असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे.
सध्या प्रणवचा शोध मुंबईतल्या कंपनीने सुरू केला आहे. पण प्रणव बेपत्ता झाल्याची माहिती दिल्यानंतर आत्तापर्यंत मुंबईतील कंपनीने कोणतीही समाधनकारक माहिती दिलेली नाहीये, असं त्याच्या व़डीलांनी सांगितलं.
प्रणवचे वडील गोपाळ कराड म्हणाले की, माझा मुलगा मला परत मिळाला पाहिजे. कंपनी त्याच्याबाबत कोणतीही माहिती व्यवस्थित देत नाहीये. फक्त आमचं शोधकाम सुरू आहे, असं कंपनी सांगत आहे. मी याबाबत वारजे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पण पोलिसांकडूनही हवी तशी मदत मिळत नाहीये.