काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हैदराबादमध्ये एका सभेला संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. जर आम्ही सत्तेत आलो तर संपत्तीचे सर्वेक्षण करणार, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे.
सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी संपत्तीच्या वाटपाचा मुद्दा उपस्थित केला. जर काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर देशातली सर्वाधिक संपत्ती कुणाकडे आहे, याचं सर्व्हेक्षण करण्यासाठी एका वित्तिय संस्थेचं गठण करण्यात येईल, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
काँग्रेस सत्तेत आल्यास देशात ओबीसी, एससी, एसटी आणि अल्पसंख्यांक समूदायातील लोक किती आहेत याचं सर्व्हेक्षण अगोदर केलं जाईल. त्यानंतर संपत्तीचं समान वाटप करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचललं जाईल. त्यानुसार एक वित्तीय संस्था आणि संस्थात्मक पातळीवर सर्व्हेक्षण केलं जाईल. तसंच ज्याची जेवढी लोकसंख्या आहे त्यांना तेवढा हक्क मिळवून देण्यासाठी काँग्रेस पावलं उचलणार असल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे.