लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सध्या महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. आज (7 एप्रिल) मनोज जरांगे पाटील पुण्यात आले होते. यावेळी ते देहूत संत तुकाराम महाराजांच्या चरणी लीन झाले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगेंनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना थेट आव्हान दिलं आहे.
छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उभं राहावं, मग आमची भूमिका सांगतो. तसंच भुजबळांबद्दल जास्त काही विचारू नका. त्यांनी लोकसभा लढायचं अंतिम केल्यानंतर मी सांगतो, असं मनोज जरांगे म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे नाशिक लोकसभेतून निवडणूक लढणार असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत माध्यमांनी मनोज जरांगेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मराठा समाजाने कोणाला निवडून द्यायचं हे ठरवावं. पण जर नाशिक लोकसभेत भुजबळ उभे राहिले तर मग तिथे काय भूमिका घ्यायची हे मी त्यावेळी सांगेन, असे जरांगे म्हणाले.