सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) अद्यापही तिढा सुटलेला नाहीये. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून (Shivsena) सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे या जागेवर काँग्रेसनेही आपला दावा केलेा आहे. या जागेसाठी दोन्ही पक्षांकडून दावे केले जातून असून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
सांगली या जागेसाठी इच्छुक असलेले काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांनी संजय राऊत यांनी विश्वजीत कदम यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली. तसंच महाविकास आघाडीची उद्या पत्रकार परिषद होणार असून यामध्ये सांगलीतून मविआचा अधिकृत उमेदवार कोण असेल? याचा निर्णय घोषित होईल, असं विशाल पाटील यांनी सांगितलं.
विशाल पाटील म्हणाले की, काँग्रेस पक्षात सर्वांनी निर्णय घेतला होता की विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करायचं आहे आणि उमेदावारी पक्षाच्या बाजून घ्यायची आहे. याची खात्री आम्ही विश्वजीत कदम यांना दिली होती. तसंच सर्वांच्या मताचा विचार करून माझ्या नावाचा निर्णय झाला आहे. पण जागा वाटपाचा तिढा अनपेक्षितपणे निर्माण झाला असून यावर वाद घालण्यापेक्षा आम्ही आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
आमच्या मनात खासदार संजय राऊत यांच्याबद्दल आदराची भावना आहे. पण विश्वजीत कदम यांच्यावर संशय निर्माण करून त्यांच्याविरोधात बोलणं हे युती धर्माला शोभणारं नाही, असेही विशाल पाटील म्हणाले.