‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) काही दिवसांपासून अडचणीत आहे. रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष पुरवल्याप्रकरणी एल्विश यादव सुमारे 6 दिवस न्यायालयीन कोठडीत होता आणि आता तो तुरुंगाबाहेर आला आहे.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एल्विश यादवने एबीपी न्यूजशी याबाबत खुलेपणाने संवाद साधला आहे. एल्विश यादवने सांगितले की, कोणीतरी आपल्याला फसवत आहे आणि सत्य एक दिवस सर्वांसमोर येईल.
रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा पुरवठा करण्याबाबत एल्विश यादव म्हणाला की, माझा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. न्यायव्यवस्था जे काही करेल ते योग्य आणि आमच्या बाजूने करेल. हे कसं झालं माहीत नाही. त्या दिवशी मी मुंबईत होतो आणि माझ्यावर असे आरोप झाल्याचे बातम्यांमध्ये पाहिले. त्यानंतर 5 महिने काहीच झाले नाही, मग एक दिवस अचानक मला दिसले की तुम्ही लोकांनी बातमी केली आहे.
तुम्ही जो व्हिडिओ पाहता तो गळ्यात सापाचा आहे, तो व्हिडिओ सर्वांना दिसतो पण प्रत्यक्षात तो फाजिल पुरिया भाई आहे ज्यांचे गाणे आहे ‘लडकी ब्युटीफूल कर गई चुल’, त्यांचे दुसरे गाणे आहे 32 बोर. ,तुम्हाला ते यूट्यूबवरही सापडेल. तुम्ही त्यावर जाऊन पाहाल तर त्यात सापांची दृश्ये आहेत. त्यामुळे त्या व्हिडीओचा जो व्लॉग बनवला आहे किंवा त्याला BTS म्हणा, तो त्या काळातील शूट आहे. ते गाण्याचे शूट आहे.
जेव्हा कोणावर विनाकारण आरोप केले जातात तेव्हा कुटुंबातील सदस्यांची मानसिक शांती देखील भंग पावते, प्रत्येकजण दुःखी आणि काळजीत राहतो. सध्या बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, पण हळूहळू सर्व काही ठीक होईल, असेही एल्विश यादव म्हणाला.