लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बारामतीची निवडणूक यंदा प्रतिष्ठेची होणार आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लोकसभेची लढत होणार आहे. दरम्यान यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवारांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत आणि सुप्रिया सुळे यांना मत म्हणजे राहुल गांधी यांना मत असे एवढे स्पष्ट आहे. असे फडणवीस म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस नागपुरात माध्यमांशी संवाद साधत होते. बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती असे राजकीय समीकरण अशे हे आपल्याला माहितीच आहे. मात्र यंदाची बारामतीची निवडणूक ही रंगतदार होणार आहेत. अक्ख्या देशाचे याकडे लक्ष लागले आहे. यावर फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवारांना जिंकून आल्या तर, त्यांचा पाठिंबा नरेंद्र मोदींना असेल. तर सुप्रिया सुळे जिंकून आल्या तर त्यांचा पाठिंबा राहुल गांधींना असेल. इतके स्पष्ट मी सांगितले आहे.
गेल्या ३० वर्षांपासून बारामती लोकसभा हा पवारांचा बालेकिल्ला समजला जातो. सुप्रिया सुळे यान गेल्या तीन टर्म बारामतीमधून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. मात्र जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादीत दोन गट पडले. त्यानंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार गट असे दोन पक्षत पडले. त्यामुळे यंदाची बारामतीची निडवणूक रंगतदार होताना दिसणार आहे.