मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) महायुतीत (Mahayuti) सामिल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसंच मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर मनसे महायुतीत समाविष्ट होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर या चर्चा थंड पडल्या होत्या. अशातच आता मनसे महायुतीत येणार का? अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. याचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या काळात मनसेसोबत आमच्या चर्चा झालेल्या आहेत. जेव्हा मनसेनं हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासून त्यांची आणि आमची जवळीक वाढली आहे. तसंच राज ठाकरे हे असे पहिले व्यक्ती आहे ज्यांनी 2014 साली पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं होतं. तसंच त्यांनी जाहीर भूमिका घेतली होती की, मोदींना पंतप्रधान बनवलं पाहीजे.
मला असं वाटतं की दहा वर्षांत मोदींनी भारताचा विकास केला आहे. त्यामुळे मोदींच्या पाठिशी सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. तसंच जे लोक राष्ट्रभावनेनं प्रेरित आहेत त्यांनी मोदींसोबत राहिलं पाहिजे. तर राज ठाकरे आणि त्यांची मनसे मोदींसोबत राहिल. त्यांना मोदींचा पाठिंबा असले, त्यामुळे आता त्यांना निर्णय घ्यायचा आहे. पण माझी अपेक्षा आहे की त्यांनी मोदींना पाठिंबा द्यायला हवा, असंही फडणवीस म्हणाले.