आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सला अखेर सूर गवसला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात यंदा मुंबईने पहिला विजय अखेर प्राप्त केला आहे. २९ धावांनी मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे. मुंबईला पहिल्या तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर अखेर मुंबईने विजय प्राप्त केला आहे. मुंबई इंडियन्सच्या विजयामध्ये भारताचा प्रमुख गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहची भूमिका मोठी ठरली. त्याची भूमिका कशी महत्वाची ठरली ती जाणून घेऊयात.
मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २३४ धावांचा डोंगर उभा केला. दिल्लीला धावांचा पाठलाग करताना २०५ धावांचा पाठलाग करता आला. दिल्लीच्या पराभवामध्ये बुमराहची गोलंदाजी महत्वाची ठरली. बुमराहने भेदक गोलंदाजी केली. दिल्लीचा फलंदाज पृथ्वी शॉ हा मुंबईसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराहने टाकलेल्या भेदक यॉर्करने पृथ्वी शॉ चा त्रिफळा उडवला. त्यामुळे मुंबईचा विजय सुकर झाला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजीचे निमंत्रण दिले. सुरुवातीला रोहित आणि ईशान या सलामीच्या जोडीने सुरुवात चांगली केली. त्यानंतर मुंबईचा डाव थोडा गडगडला होता. मात्र त्यानंतर हार्दिक आणि टीम डेव्हिड आणि शेवटच्या ७ ते ८ चेंडूत शेफर्ड याने केलेली तुफान फटकेबाजी यावर मुंबईने २३४ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स जेव्हा फलंदाजीला आल्यावर पृथ्वी शॉ ने ६६ धावांची खेळी केली. मात्र भेदक गोलंदाज जसप्रीत बुमराहने जबरदस्त यॉर्कर टाकून पृथ्वीला बाद केले. त्यानंतर मुंबईच्या बॉलर्सनी चांगली गोलंदाजी करत यंदाच्या हंगामातील मुंबईला पहिला विजय मिळवून दिला. त्यामुळे मुंबईच्या संघाला आणि व्यवस्थपनाला दिलासा मिळाला आहे.