लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वर्धा येथे सभेला संबोधित केले. महाराष्ट्राच्या वर्धा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, संसदेत सर्वाधिक खासदार पाठवणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये जनतेला भाजपला पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे.
”लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयावर योगी आदित्यनाथ यांनी विश्वास व्यक्त केला आहे. स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे ज्यात जनतेला माहिती आहे की, आयेंगे तो मोदी ही,’ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. पुढे सभेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ म्हणाले, ”२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मी उत्तर प्रदेशमधून आलो आहे, जिथे लोकसभेच्या ८० जागांवर सात टप्प्यात मतदान होणार आहे. ”
पुढे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी गेल्या १० वर्षांत भारताला एक नवीन ओळख, आदर आणि सुरक्षा दिली आहे. “हे सर्व लक्षात घेऊन मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो की “आयेंगे तो मोदी ही.” आज जगभरात भारतीय पासपोर्टचे मूल्य वाढले आहे. पण २०१४ पूर्वी शत्रू भारताच्या सीमेत घुसायचे. सरकार डोळे बंद करायचे. आता सीमा सुरक्षित झाली आहे. दहशतवादाचे सर्वात मोठे मूळ काश्मीरमधील कलम ३७० होते.