आज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना रंगणार आहे. दरम्यान आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकली आहे. दरम्यान चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट रायडर्स प्रथम फलंदाजी करणार आहे. दरम्यान हा सामना चेन्नईच्या पी. चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
आजचा सामना जिथे होणार आहे त्या चिंदंबरम स्टेडियमवरील खेळपट्टी गोलंदाजांची पोषक आहे. येथे फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व कायम पाहायला मिळते. मात्र यावर्षी येथील खेळपट्टी वेगळी आहे. यंदा इथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली तर, फिरकी गोलंदाजांना थोडा संघर्ष करावा लागला. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने आपले चारही सामने जिंकले आहेत, त्यामुळे हा संघ 8 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. याशिवाय कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचे सलग तीनही सामने जिंकले, त्यामुळे श्रेयस अय्यरच्या संघाचे ६ गुण झाले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.चेन्नई ४ त्या स्थानावर आहे.