देशातील वातावरण सध्या बदलत आहे. कुठे कडक उन्हाचा तडाखा, पावसाळी हवामान पाहायला मिळत आहे. देशातील काही भागांमध्ये बर्फवृष्टी होत आहे. दरम्यान काही भागात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. तर काही भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. , पुद्दुचेरी, केरळ, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश या भागांत पावसाची शक्यता वर्तविली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तसेच बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने अरुणाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अमृतसर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यातील विदर्भात देखील पावसाची शक्यता देण्यात आली आहे. हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये काही निवडक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गोव्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र देखील उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच धुके पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. महाराष्ट्रात विदर्भ आणि राज्याच्या इतर भागांमध्ये कडक ऊन जाणवत आहे. पुणे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागात उन्हाचा कडक जाणवत आहे. राज्य सरकारने उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे.