आधुनिकीकरण हा शब्द डोळ्यांसमोर आला की, आपसुकच मनामध्ये उंचच उंच इमारती सिमेंट काँक्रीटचे रस्ते, अत्याधुनिक यंत्रे, माणसांचे तथाकथित उंचावलेले भौतिक राहणीमान याचे नकळत चित्र उभे राहते. सध्याच्या काळाचा विचार केला, तर असे दिसून येते की ‘प्रगती’ चे मोजमाप हे आर्थिक मूल्यांकनावर अवलंबून आहे. तुमचे जेवढे भौतिक राहणीमान उंचावलेले असेल त्या अनुशंगाने तुमच्यावर ‘प्रगत’ वा ‘अप्रगत’ या श्रेणींचा शिक्कामोर्तब होतो. परंतु या सध्याच्या तथाकथित ‘विज्ञान युगामध्ये खरे, शाश्वत आधुनिकीकरण कोणते हेच मुळात मनुष्य समाज विसरत चालला आहे.
तंत्रयुगाच्या नावाखाली मनुष्य आपल्या मूल प्रकृतीपासून दूर जाऊ लागला आहे आणि ही भविष्यात येऊ घातलेल्या धोक्याची घंटा आहे तर नाही ना? काही धोके तर दरवाजाच्या उभरठ्यावर येऊन उभे ठाकले आहेत. यांचा जर वेळीच सामना केला नाही, तर पुढील पिढ्यासाठी ते नक्कीच हानिकारक ठरेल.
जर आपण डोळसपणे पाहीले तर लक्षात येईल की या वर्षी च्या उष्मा ऋतू मध्ये तापमान वाढ ही प्रचंड झालेली दिसते. याची बरीच कारणे आहेत जसे की रस्ते, इमारती बांधण्यासाठी केलेली बेछूट वृक्षतोड. भविष्याचा विचार न करता केवळ आपली गरज भागावी, आपला स्वार्थ साधला जावा, भौतिक राहणीमान उंचावे यासाठी आपण अविवेकाने वृक्षतोड करून आपले घरे मोठी केली. भारताच्या सिलिकॉन व्हॅलीची पण तिच स्थिती. तिथे निर्माण झालेल्या जल तुडवड्यामुळे बरेच स्थलांतरीत झालेल्या लोकांंनी पुन्हा आपापल्या गावी प्रस्थापित होण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. यातून आपण हे शिकायला हवं की, गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीने तहान भागत नाही.
पुढील येणाऱ्या पिढ्याना आपण काही तरी देणं लागतो हा विचार सतत मनामध्ये हवा. जेवढा नैसर्गिक साधनसंपत्तीवर आपला हक्क आहे तेवढाच हक्क येऊ घातलेल्या पिढ्यांचाही आहे हे विसरता कामा नये. पर्यावरणीय समस्या सोडवणं ही आता काळाची गरज बनली आहे त्यासाठी सर्व क्षेत्रामधील. व्यक्तींनी समाजामध्ये येऊन चर्चेच्या निष्कर्षांती स सर्वसामावेशक असा उपाया उपाय सुचवावा. ही कामे केवळ प्रशासनामध्ये बसलेल्या लोकांची नसून ती समाजाची आहेत. जेव्हा आपण ‘समाज’ म्हणून सर्व हेवेदावे विसरून समस्यांचे निराकरण करण्यासाठी चित्ताने लढाई लढली तर शुद्ध यश हे नक्कीच प्राप्त होईल. जेव्हा समाज मोठा होतो तेव्हा राष्ट्र बलाढ्य आधुनिकीकरण व्हावे पण त्याचे अंधुकिकरण नको एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आधुनिकीकरण व्हावे कारण ‘अति सर्वत्र वर्जयेत’
:
Tags: Developmentenvoirnmentnatural resourcespeoplestechnology