दिल्लीमध्ये निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. २६ एप्रिल रोजी दिल्लीत महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान १८ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २६ एप्रिल रोजी महानगरपालिकेची बैठक होईल. या बैठकीत महापौर आणि उपमहापौर यांची निवड करण्यात येणार आहे.
दिल्ली महानगरपालिकेचे सचिव शिव प्रसाद यांनी याबद्दलची माहिती जारी केली आहे. दिल्ली महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा २६ एप्रिल रोजी श्यामा प्रसाद मुखर्जी सिव्हिक सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या सभेत महापौर आणि उपमहापौर यांची निवड केली जाईल. गेल्या वर्षी, आम आदमी पार्टी (AAP) उमेदवार शेली ओबेरॉय आणि आले मुहम्मद इक्बाल यांची दिल्लीत अनुक्रमे महापौर आणि उपमहापौरपदी भाजपच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर पुन्हा निवडून आले.