संदेशखली प्रकरणात कोलकाता हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. संदेशखली येथील बलात्कार प्रकरण व जमिनी हडपल्याचे प्रकरण अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहे. या सर्व आरोपांची सीबीआय चौकशी होणार आहे. कोलकाता हायकोर्टाने या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कोलकाता उच्च न्यायालयाने सांगितले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी संदेशखली , बंगालमधील खंडणी, जमीन हडप आणि लैंगिक छळाच्या आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी केली जाईल. ५ जानेवारी रोजी संदेशखळी येथे ईडीच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या तपासावर न्यायालय आता देखरेख ठेवणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशाने ममता सरकारला मोठा धक्का बसला आहे.
पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखाली गाव सध्या चर्चेत आहे. शाहजहान शेख याने जमिनीवर कब्जा करण्यासोबतच काही महिलांचे लैंगिक शोषणही केल्याचा आरोप गावातील महिलांनी केला आहे. बंगालचे संपूर्ण राजकारण सध्या संदेशखालीभोवती फिरत आहे. मात्र, अलीकडेच शाहजहानला अटक करण्यात आली. संदेशखली येथे ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यात आणि तेथील महिलांचे शोषण केल्याप्रकरणी ईडीने शाहजहान शेखला अटक केली होती. मात्र आता ईडीने त्यांच्याबाबतीत आणखी एक कठोर कारवाई केली आहे.
संदेशखली प्रकरणातील आरोपी शाहजहान शेख याची बँक अकाउंट्स ईडीने फ्रीझ केली आहेत. ईडीच्या एका सूत्राने सांगितले की, ही प्रक्रिया दोन बँक खात्यांमधून सुरू करण्यात आली आहे, एक शहाजहानच्या नावाने वैयक्तिकरित्या आणि दुसरे मासळी निर्यात संस्थेच्या नावाने “मेसर्स शेख सबिना फिश सप्लाय ओन्ली”, जे शाहजहानची मुलगी शेख सबिना यांच्या मालकीचे आहे.