आज आसामच्या लखीमपूर येथे पोहोचलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुख्यमंत्री डॉ हिमंता बिस्वा सरमा यांनी जोरदार स्वागत केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मेगा रॅलीला संबोधित करण्यासाठी शहा तिथे पोचले आहेत. यावेळी शहा यांना श्रीमंत शंकरदेव यांचे शिष्य व महापुरुष माधवदेव यांचे छायाचित्र आणि आदराचे प्रतीक म्हणून पारंपरिक गमोसा भेट देण्यात आला.
उत्साही जनसमुदायाला संबोधित करताना शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पक्षाच्या राज्यातील ऐतिहासिक योगदानाबाबत थेट प्रश्न विचारला.
“मला राहुलबाबाला विचारायचे आहे, की तुम्ही आसामसाठी काय केले? तुमच्या आजीच्या (इंदिरा गांधी) काळापासून तुम्ही आसामसाठी काय केले?” आसामच्या विकासात उत्तरदायित्व आणि ठोस परिणामांच्या गरजेवर भर देत शहा यांनी काँग्रेसला जाब विचारला आहे.
शाह यांनी आसाममध्ये होणारा अवैध स्थलांतरितांचा ओघ रोखण्यासाठी भाजप सरकारच्या प्रयत्नांवर जोर दिला, जो प्रदेशासाठी एक प्रमुख चिंतेचा विषय आहे. “भाजप सरकारने जवळपास पूर्णपणे हा आसाममधील अवैध स्थलांतरितांचा ओघ थांबवला आहे,”असे म्हणत शहा यांनी प्रशासनाच्या सक्रिय उपाययोजना सांगितल्या.
सांस्कृतिक क्षेत्राबद्दल बोलताना शाह यांनी श्रोत्यांना भूपेन हजारिका यांच्या मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची आठवण करून दिली, जो भाजपच्या कार्यकाळात प्रदान करण्यात आलेला प्रतिष्ठित सन्मान आहे. मात्र आसामच्या अश्या दिग्गजांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आणि त्यांच्या योगदानाचा पुरेसा सन्मान करण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली .
शाह यांनी काँग्रेस पक्षाने आसामबद्दलच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्याची टीका केली, विशेषत: पूर्वोत्तर राज्यासाठी समान विकास आणि न्याय सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने. त्यांनी याची तुलना महत्त्वाच्या विकासात्मक प्रकल्पांच्या नेतृत्वाच्या आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली परिवर्तनात्मक बदल घडवून आणण्याच्या भाजपच्या ट्रॅक रेकॉर्डशी केली.
शिवाय, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या रन-अपमध्ये शाह यांनी मतदारांना दोन पर्याय दिले. ते पुढे म्हणाले, “तुमचा खासदार कोण असेल, कोणता पक्ष सरकार स्थापन करेल आणि पुढचा पंतप्रधान कोण असेल हे तुम्हाला 19 एप्रिलला ठरवावे लागेल. तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. एक म्हणजे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली इंडी आघाडी आणि दुसरीकडे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली असणारा भाजप पक्ष .”
आसामची समृद्धी आणि प्रगती सुरक्षित करण्यासाठी भाजपची दूरदृष्टी आणि कर्तृत्वाचा उल्लेख करून शाह यांनी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून पाठिंबा देण्याचे आणि त्यांची निवड करण्याचे सगळ्या जनसमुदायाला आवाहन केले.