सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचीही बिगुल वाजले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरात प्रचार सभा घेत आहेत. दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये भाजपाने दक्षिण भारतात आपले पाय घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान तामिळनाडूमध्ये अन्नामलाई यांच्या रूपाने भाजपला ताकद देणारा नेता सापडला आहे. मात्र डीएमके नेते दयानिधी मारान यांनी अन्नामलाई यांना जोकर असे संबोधून हिणवले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी अन्नामलाई यांची पाठराखण केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी अन्नामलाई यांच्यावर जोकर अशा करण्यात आलेल्या टिपण्णीनंतर डीएमकेवर पलटवार केला आहे. भाजपच्या नेत्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरले गेल्याचे मोदी म्हणाले आहेत. तसेच ही टिपण्णी सत्तारूढ पक्षाचे चारित्र्य कसे आहे ते दर्शवते. हे तामिळनाडूच्या महान संस्कृतीच्या विरोधात आहे. कोईम्बतूरमधील मेट्टुपलायम येथे पंतप्रधान मोदींनी सभेला संबोधित केले. कौटुंबिक राजकारण करणारे तरुण नेत्यांना पुढे जाण्यापासून रोखतात असे मोदी म्हणाले.
”डीएमके हा सत्तेच्या अहंकारात बुडालेला पक्ष आहे. द्रमुकच्या एका ज्येष्ठ नेत्याला आमचे युवा नेते अण्णामलाई यांच्याबद्दल विचारले असता, ‘तो कोण आहे, तो कोण आहे’, असे उद्दामपणे सांगितले आणि अपमानास्पद शब्द वापरले.तामिळनाडूची महान संस्कृती. तामिळनाडूच्या लोकांना हा अहंकार कधीही आवडणार नाही”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.