छत्तीसगड राज्यात मोठा अपघात झाला आहे. छत्तीसगडमध्ये बस ५० फूट दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या बस अपघातात १२ मजुरांचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगडमधील दुर्ग या भागात हा मोठा अपघात झाला आहे. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.
छत्तीसगडच्या रायपूर-दुर्ग या भागात हा अपघात घडला आहे. ५० फूट दरीत बस कोसळली आहे. मजुरांनी भरलेली बस रात्री ५० फूट दरीत कोसळली आहे. या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १६ जण जखमी झाले आहेत. या अपघातमध्ये जखमी झालेल्या मजुरांमधील १० जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. छत्तीसगडच्या दुर्ग भागात झालेल्या अपघातानंतर याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या अपघातामध्ये जखमी झालेल्याना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच जखमींवर उपचार सुरु आहेत.