सध्याचा काळ हा लग्नसराईचा आणि सण उत्सवांचा आहे. या काळात ग्राहकांचा जास्त कल हा सोने खरेदिकडे असलेला पाहायला मिळतो. मात्र दिवसेंदिवस सोन्याचा दर वाढताना दिसत आहे. वाढत्या सोन्याच्या दरामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. आजच्या दिवशी देखील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज सोन्याचा दर ७१,५०० रुपयांच्या वर गेला आहे. तर चांदी देखील ८३ हजारांच्या वर गेली आहे. चांदीच्या दरात साधारण ३०० ते ४०० रुपयांची वाढ झालेली दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत चांदीचा दर अजून वाढण्याची शक्यता आहे.
सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. आजच्या दिवसात १० ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना ७१,५८३ रुपये मोजावे लागत आहेत. काळ १० ग्रॅम सोन्याचा दर हा ७१,३४० रुपये होता. तर चांदीच्या दरात देखील विक्रमी वाढ झाली आहे. सध्या बाजारात चांदीचा दर हा ८२,८७७ रुपयांवर पोहोचला आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळातच सोने आणि चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांची चिंता वाढली आहे. यामुळे सामान्य नागरिक सोने खरेदीकडे पाठ फिरविताना दिसत आहेत. तसेच येत्या काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.