मुंबई इंडियन्सचा (MI) कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. मुंबईचा लागोठापाठ तीनवेळा पराभव झाल्यानंतर हार्दिक पांड्याने गुजरातमधील सोमनाथ मंदिरात पूजा केली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा मोठा विजय झाला होता. तर आता आरसीबीविरोधात मुंबईचा सामना पार पडणार आहे. या सामन्याआधी हार्दिकने आज (11 एप्रिल) मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराला (Siddhivinayak Temple) भेट दिली.
हार्दिक पांड्याने आज सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्याने संघात्या विजयासाठी गणपती बाप्पापुढे साकडे घातल्याचे म्हटले जात आहे. यादरम्यान हार्दिकसोबत मुंबईचा स्टार फलंदाज ईशान किशन आणि गोलंदाज पियूष चावला देखील होता. सध्या त्यांच्या मंदिरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता आरसीबीविरोधात मुंबईला विजय मिळणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
आज मुंबईचा सामना आरसीबीसोबत होणार आहे. हा रोमांचक सामना संध्याकाळी साडेसात वाजता वानखेडे मैदानावर होणार आहे. सध्या आरसीबी आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ तळाला आहेत. त्यामुळे आता या दोन्ही संघांना विजयाची खुप गरज आहे.
दरम्यान, हार्दिक पांड्या आणि ईशान किशन यांच्यासोबतच आरसीबीच्या खेळाडूंनी देखील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. आजच्या सामन्यासाठी आरसीबीचे खेळाडू मुंबईत दाखल झाले आहेत. तर मुंबईत दाखल होताचा काही खेळाडूंनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे.