Apple ही जगातील सर्वात मोठी टेक कंपनी आहे. दरम्यान या सर्वात मोठ्या असलेल्या कंपनीने भारतासह जगातील ९० ते ९२ देशांमध्ये असणाऱ्या युजर्सना एक सावधानतेचा इशारा दिला आहे. कंपनीच्या सांगण्यानुसार भारतसह ९२ देशांमधील युजर्स हे Mercenary स्पायवेअरचे शिकार होण्याची शक्यता आहे. ॲपलने बुधवारी रात्री उशिरा या धोक्याबाबत अधिसूचना जारी केली. ॲपलचे म्हणणे आहे की त्याचे वापरकर्ते स्पायवेअर हल्ल्याचे बळी होऊ शकतात. या स्पायवेअरचा वापर निवडक वापरकर्त्यांना लक्ष्य करून केला जात आहे.
आता आघाडीची टेक कंपनी Apple ने भारतासह ९२ देशांमध्ये आपल्या वापरकर्त्यांना Mercenary Spyware अलर्ट पाठवला आहे. ॲपलच्या अधिसूचनेत पेगासस स्पायवेअरचाही उल्लेख करण्यात आला आहे. २०२१ मध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या हेरगिरीच्या आरोपांमुळे राजकीय वादळ उठले होते. ॲपलने आपल्या युजर्सना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. कंपनीने म्हटले आहे की स्पायवेअर हल्ले हे मालवेअरपेक्षा अधिक कठीण असतात जे नियमित सायबर गुन्हेगारी क्रियाकलाप वापरतात, किमान कारण स्पायवेअर हल्ला करणाऱ्या विशिष्ट लोकांना आणि त्यांच्या उपकरणांना लक्ष्य करण्यासाठी असाधारण संसाधने वापरतात. यामुळे कंपनीने ९२ देशांमधील आपल्या युजर्सना सावधान राहण्याचा इशारा दिला आहे.