लोकसभा निवडणुकांचे वारे सध्या देशभर वाहत आहे,आणि त्याचबरोबरीने लोकांच्या मनात नेत्यांबद्दल विविध प्रश्न निर्माण होत आहेत.
अशातच डॉक्टर अभिजीत फडणीस या उच्चविद्याविभूषित अर्थतज्ज्ञानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा मतदान का करायचे यासाठीची १०१ कारणे नागरिकांसमोर आणली आहेत, आणि ही कारणे तुम्हाला स्वतःला पटल्यास मोदींना मत द्या असेही त्यांनी नागरिकांना सुचविले आहे.
अर्थअभ्यासक असलेले अभिजीत फडणीस हे सीए सीएमए , सी एस सारख्या अनेक परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीतून उत्तीर्ण झालेले आहेत. तसेच त्यांनी आयआय टी बॉम्बे येथे पीएचडी केली आहे. त्यांनी म्हंटले आहे की, २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी मी नरेंद्र मोदींना निवडून का द्यायचे यासाठी एकसष्ट करणे सांगणारे पुस्तक लिहिले होते. यावेळी लोकांना आवाहन करताना त्यांनी म्हंटले आहे की, ” स्वामी विवेकानंदानी , योगी अरविंदानी आपले राष्ट्र पून्हा एकदा विश्वगुरू होईल असे भाकीत वर्तवले होते. त्यासाठी अध्यात्मिक ,सामाजिक उत्थानाबरोबरच राजकीय उत्थानही तेवढेच महत्वाचे आहे.त्यासाठी आपण नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिले पाहिजे आणि मतदानाचा हक्क बजावला पाहिजे “.
मोदी यांना निवडून द्यायच्या कारणांमध्ये त्यांनी जीएसटी, डिजिटल इंडिया, कलम ३७० रद्द करणे , नोटबंदी, तिहेरी तलाक कायदा,सीएए अश्या मोदींचा अनेक ऐतिहासिक निर्णयांचा उल्लेख केला आहे. तसेच गुलामी निशाणे रद्द, सैन्य सक्षमीकरण ,तीर्थक्षेत्रे विकास ,महिला सक्षमीकरण अश्याही अनेक विकासकामांचा गोषवारा फडणीस यांनी घेतला आहे.त्याबरोबर मोदींचे परराष्ट्र धोरण, आयुष्यमान भारत, आत्मनिर्भर भारत सारख्या योजना यांचाही समावेश फडणीस यानी दिलेल्या कारणामध्ये आहे .