मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत खराब अशी झाली आहे. चारपैकी पहिले तीन सामने मुंबई इंडियन्स पराभूत झाली आहे. चारपैकी एकच सामना त्यांना जिंकता आला आहे. तसेच सध्या हार्दिक पांड्याला व्यावसायिक स्तरावर देखील अडचणींचा सामन करावा लागत आहे. हार्दिक पंड्याच्या चुलत भावाला अटक करण्यात आली आहे. व्यवसायात फसवणूक केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.
हार्दिक आणि कृणाल पांड्याला फसवल्याप्रकरणी वैभव पांड्यला अटक करण्यात आली आहे. वैभव पंड्यावर पैशांची अफरातफर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हार्दिक, कृणाल आणि वैभव पंड्या यांनी एकत्रितपणे एक कंपनी सुरु केली होती. मात्र त्यानंतर वैभव याने स्वतंत्र व्यवसाय त्याच कंपनीत सुरु केला. त्यामुळे नियमांचे उल्लंघन आणि अफरातफर यासाठी त्याला अटक करण्यात आली आहे.
सध्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार हा हार्दिक पंड्या आहे. त्याच्या नेतृत्वात त्याला हवे तसे यश संघाला मिळवून देता आलेले नाही. पहिल्या काही सामन्यात हार्दिकला प्रचंड ट्रोल करण्यात आले. रोहित शर्माच्या जागी हार्दिकला कर्णधार करणे हे मुंबईच्या आणि रोहितच्या चाहत्यांना अजिबात आवडलेले दिसून येत नाहीये.