सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. एनडीए आणि इंडी आघाडीने देशभरात प्रचार सुरु केला आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या लोकसभा मतदारसंघात प्रचार करत आहे. तसेच भाजपाने देखील आपले स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मध्य प्रदेशमधील निवडणूक सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी तो दिवस दूर नाही ज्या वेळेस भारत जगातील सर्वात शक्तिशाली देश असेल, असे विधान केले आहे. तसेच त्यांनी यावेळी आणीबाणी, पाकिस्तान व दहशतवाद यावर देखील भाष्य केले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या निवडणूक दौऱ्यावर आहेत. निवडणुकीच्या वातावरणात संरक्षणमंत्र्यांनी चीन-पाकिस्तानलाही टोला लगावला असून भारताकडे वाईट नजर ठेवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा कडक संदेश दोन्ही शेजारी देशांना दिला आहे. राजनाथ सिंह यांनी सीमेवरील भारतीय भूमीवर चीनच्या खोट्या दाव्याबाबत चीनला कडक संदेश देत देशाच्या एक इंचही भूभागावर कब्जा करू शकत नाही, असे पाकिस्तानवर निशाणा साधताना संरक्षण मंत्री म्हणाले की, पाकिस्तानला दहशतवादाचा फटका सहन करावा लागत आहे. भोगावे लागतील.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या मुलाखतीदरम्यान १९७५ च्या आणीबाणीच्या काळाची आठवण करून देताना सांगितले की, “आणीबाणीच्या काळात माझ्या आईचे अंतिम संस्कार करण्यासाठीही मला पॅरोल देण्यात आला नव्हता आणि ते आमच्यावर हुकूमशाहीचा आरोप करतात.” चीनच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत राजनाथ सिंह म्हणाले, “काँग्रेसच्या कार्यकाळात काय झाले, किती हजार चौरस किलोमीटर जमीन चीनच्या ताब्यात आली, हे मला सांगायचे नाही. पण मी देशातील जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कोणीही एक इंचही जमीन काबीज करू शकत नाही, आम्ही एक इंचही जमीन जाऊ देणार नाही.”