पुणे – दिनांक 11 एप्रिल 2024 या दिवशी सकाळी गोखले इन्स्टिट्यूट पुणे येथील अकॅडमी इमारतील लोकशाही विरोधातील नोटा या पर्यायाची प्रसिद्धी करणारे पोस्टर आढळून आले. यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तत्काळ कारवाई करण्याची मागणी करत गोखले इन्स्टिट्यूटच्या प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त केला.
सध्या संपूर्ण देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचे वातावरण असताना निवडणूक आयोग आणि अन्य संस्था जास्तीत जास्त मतदान व्हावे व नोटा या पर्यायाचा वापर कमीत कमी व्हावा यासाठी जागरूकता निर्माण करत आहे. त्या अंतर्गत निवडणूक गोखले प्रशासनाकडून डेमोक्रसी वॉल चा बॅनर लावण्यात आला होता. यावर विद्यार्थ्यांनी लोकशाही पूरक व मतदान करावे यासाठी मजकूर लिहिण्यासाठी जागा होती.
गोखले इन्स्टिट्यूट मधील डाव्या आणि नक्षलवादी विचारांच्या काही विद्यार्थ्यांनी नोटा हाच कसा उत्तम पर्याय आहे. या प्रकारचा मजकूर लिहिला. आयोगाच्या नियमावलीनुसार नोटा या पर्यायाची जनजागृती कोणीही करू शकत नाही. संबंधित पोस्टरवर निवडणूक आयोग व गोखले इन्स्टिट्यूट चा लोगो असून सुद्धा कोणतीही कारवाई कुठल्याही प्रशासनाकडून केली गेली नाही. म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई करावी म्हणून महाविद्यालयाबाहेर निदर्शने केली. त्याचबरोबर या दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत असताना संबंधित पोलीस ठाणे व निवडणूक आयोग मध्ये गोखले इन्स्टिट्यूट च्या प्रशासनावर देखील कारवाई व्हावी याकरिता निवेदन दिली.
देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू असताना देखील अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना महाविद्यालयात घडत असून त्यांना पाठीशी घालणारे प्रशासन अत्यंत निर्लज्ज आहे. या प्रशासनाविरुद्ध अभाविप मोठ्या आंदोलन उभे करेल. असे मत प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी व्यक्त केले.
शहरी नक्षलवादी विचारसरणीच्या चळवळी या नॅशनल इन्स्टिट्यूट मध्ये सक्रिय असून विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापकांची यादी तयार करून देश विरोधी कृत्य घडत आहेत लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी असे मत हर्षवर्धन हारपुडे पुणे महानगर मंत्री यांनी व्यक्त केले.