सध्या देशभरात लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. सर्वच पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील देशभरात प्रचसभांचा धडाका लावला आहे. आज पंतप्रधान मोदींनी उधमपूर येथील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसने ७० वर्षांत कलम ३७० ची भिंत कधी तोडली नाही. मात्र आम्ही येथे ६० वर्षांपासूनचा प्रश्न सोडवला.
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० चा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही ६० वर्षांपासूनचे असलेले प्रश्न सोडवले. आमच्या सरकारने आव्हाने झेलली आणि पेलली. समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. हेही आम्ही करून दाखवले. आता जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद, फुटीरतावाद आणि दगडफेक ही समस्या राहिलेली नाही, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ”दहशतवाद, फुटीरतावाद, दगडफेक, सीमेपलीकडून गोळीबार… हे आता जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचे मुद्दे नाहीत. याआधी माता वैष्णोदेवी यात्रा असो की अमरनाथ यात्रा, ती सुरक्षितपणे कशी पार पाडायची याची चिंता होती. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये विकास होत आहे आणि विश्वासही वाढत आहे. अशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे.