देशातील वातावरणात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. देशातील काही भागांमध्ये पावसाळी, बर्फवृष्टी, कडक उन्हाळा जाणवत आहे. अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. महाराष्ट्रात देखील सध्या अशाच प्रकारचे वातावरण बघायला मिळत आहे. दरम्यान आजही देशातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागांत अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. मध्ये प्रदेश, छत्तीसगडमध्ये वादळी वाऱ्यांसह हलका ते माध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच पुढील एक ते दोन दिवसांमध्ये जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये , हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. अवकाळी पावसाचा फटका विदर्भ मराठवाडा येथिक पिकांना बसला आहे. अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.