मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी आज (12 एप्रिल) कैराना आणि सहारनपूर येथे आयोजित जाहीर सभांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या कामगिरीचे वर्णन करताना सपा, बसपा आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
योगी आदित्यनाथ म्हणाले की, भाजप सरकारने खासगी कूपनलिका शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून दिली आहे. तसेच मुलीच्या जन्मापासून तिच्या विवाहित आयुष्यापर्यंत आम्ही नियोजन केले आहे. पूर्वी फक्त दोन-तीन जिल्ह्यातील लोक सरकारी भरतीत सहभागी होत असत. पूर्वी माफिया जोरजोरात बोलत असत, पण आता ते दंगा कसा करायचा हे विसरले आहेत.
सहारनपूरमध्ये मुख्यमंत्री योगी म्हणाले की, आता दंगल, कर्फ्यू आणि भीती नाही. सहारनपूर आता विकासाच्या प्रवासात सामील झाले आहे. सहारनपूर मागील सरकारच्या दंगल धोरणात अडकले होते. शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले. मुली सुरक्षित नाहीत, तरुणांचे स्थलांतर होत आहे. जो दंगल करेल त्याच्या बाप-आजोबांची जमीन जप्त करेल. तसेच दंगल करणाऱ्यांना उलटे टांगले जाते. उलटे लटकवून खालून मिरचीची धुरी दिली जाते, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.