भाजपचा ४०० पारचा नारा हा देशात सकारात्मक बदल करण्यासाठी आहे. अजूनही अनेक सकारात्मक कायदे निर्माण करण्यासाठी तीन चतुर्थांश बहुमताची आवश्यकता आहे. आणि हे बहुमत आम्ही लोकशाही मार्गाने मिळवीत आहोत, असे भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली.टेंभुर्णी (ता. माढा) येथे महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
यावेळी महायुतीचे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, माढा लोकसभा प्रभारी प्रशांत परिचारक,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, शिवसेना लोकसभा प्रमुख महेश साठे, भाजप जिल्हाध्यक्ष चेतन केदार-सावंत, रयत क्रांतीचे सुहास पाटील, शिव मल्हारचे प्रदेशाध्यक्ष दौलत शितोळे, राजकुमार पाटील, योगेश बोबडे, वैभव मोरे, योगेश पाटील, सुहास पाटील जामगावकर, बंडू ढवळे, सचिन शिंदे, धनश्री खटके आदी उपस्थित होते.