इराण पुढील ४८ तासांमध्ये इस्त्राईलवर हल्ला करण्याची शक्यता आहे. याबाबतची शक्यता वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका स्पेशल रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. इराण इस्त्राईलच्या दक्षिणी भागात हल्ला करण्याची शक्यता असल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. अहवालात एका व्यक्तीचा उल्लेख आहे ज्याला इराणच्या राजवटीच्या नेतृत्वाच्या वतीने माहिती देण्यात आली होती. हल्ल्याच्या योजनांवर चर्चा झाली असल्याने याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. हा हल्ला सीरियातील इराणी वाणिज्य दूतावासावरील कथित इस्रायली हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून असेल, ज्यात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे कमांडर आणि सदस्य मारले गेले. दरम्यान या स्पेशल रिपोर्टमध्ये करण्यात आलेली शक्यता खरी ठरल्यास म्हणजेच इराणने इस्राईलवर हल्ल्या केल्यास आणखी एका नवीन युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुढच्या ४८ तासांमध्ये इराणकडून इस्त्रायलवर मोठा हल्ला होऊ शकतो असं वृत्त अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने त्याच्या एका विशेष रिपोर्टमध्ये दिले आहे. या आधी इराणने इस्त्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. इराणी दूतावासावर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये इराणच्या सुरक्षा रक्षक आणि अधिकारी मारले गेले. हा हल्ला इस्त्रायलने केला होता. त्याचा बदल आता इराण घेण्याच्या तयारीत आहे. दरम्यान नेत्यानाहू यांनी देखील आमच्यावर कोणी हल्ला केल्यास त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल असे सांगितले आहे. दरम्यान परराष्ट्र खात्याने देखील इराण आणि इस्त्राईल यामधील भारतीय नागरिकांसाठी निर्देश जारी केले आहेत. इराण-इस्त्राईलचा प्रवेश टाळा आणि भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.