सध्या भारत देश आत्मनिर्भरतेकडे मोठ्या वेगाने वाटचाल करत आहे. संरक्षण क्षेत्रात देखील भारत आज मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि स्वदेशी हत्यारे तयार करत आहे. तसेच संरक्षण क्षेत्रातील निर्यात देखील भारताची २१, ००० कोटींच्या वर जाऊन पोहोचली आहे. यातच भारताने संरक्षण क्षेत्र भक्कम करण्याचे ठरविले आहे. अनेक नवीन हत्यारे, लढाऊ विमाने, पाणबुडी यांची निर्मिती भारतात केली जात आहे. आज चीन व पाकिस्तान या शत्रू राष्ट्रांशी एकाच वेळी दोन हात करण्याची क्षमता भारतीय सैन्य दलांमध्ये आहे. यातच आता संरक्षण मंत्रालयाने भारतीय हवाई दलाची क्षमता वाढवण्याच्या आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने ९७ LCA मार्क 1A लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ला ६५,००० कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे.
संरक्षणाच्या बाबतीत स्वावलंबनाच्या दिशेने सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. संरक्षण मंत्रालयाने भारतीय हवाई दलाची क्षमता वाढवण्याच्या आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने 97 LCA मार्क 1A लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ला ६५,००० कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे.
भारत सरकारने स्वदेशी लष्करी हार्डवेअरसाठी दिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर आहे. अलीकडेच संरक्षण मंत्रालयाने एचएएलला एक निविदा जारी केली होती आणि त्याला उत्तर देण्यासाठी त्यांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. याचा फायदा संरक्षण क्षेत्रातील छोट्या आणि मध्यमवर्गीय कंपन्यांच्या व्यवसायालाही होणार आहे. पंतप्रधान मोदी सतत HAL ला प्रोत्साहन देत आहेत आणि म्हणूनच HAL ला सर्व प्रकारची स्वदेशी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि इंजिन तयार करण्याचे प्रोजेक्ट्स मिळत आहेत.