मासिक पाळी दरम्यान तरुणींना शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो. मासिक पाळीतील काही दिवस त्यांच्यासाठी वेदनादायी असतात. या काळामध्ये तरुणींना आरामाची गरज असते. मासिक पाळीच्या काळात तरुणींना आराम मिळावा यासाठी पंजाब राज्याने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना मासिक पाळीत रजा देण्याचा महत्वाचा निर्णय पंजाब विद्यापीठाने घेतला आहे. २०२४-२०२५ या शैक्षणिक क्षेत्रात पंजाब विद्यापीठाने हा महत्वाचा निर्णय जारी केला आहे.