अरुण गोविल. हे नाव ऐकताच किंवा यांना पाहताच आपल्याला आठवतात ते प्रभू श्रीरामचंद्र. रामायण मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल हे आता राजकारणाच्या आखाड्यात उतरले आहे. भाजपाने त्यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटात अरुण गोविल राजा दशरथच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. राजकारणात आल्यामुळे अरुण गोविल हे कलाक्षेत्राला सोडचिट्ठी देणार असल्याचे सांगितले जात आहे.
अरुण गोविल हे आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी अत्यन्त उत्सुक आहेत. त्यांनी अभिनय क्षेत्र पूर्णपणे सोडल्याचे सांगितले. याबाबत त्यांनी एका मुलाखतीमध्ये भाष्य केले होते. एका मुलाखतीत अरुण गोविल यांनी राजकारणानंतर अभिनयाच्या दुनियेत पुनरागमन करण्याबाबत सांगितले की,”अभिनयक्षेत्रापासून वेगळ्या असलेल्या माझ्या कारकिर्दीची ही एक नवीन इनिंग आहे आणि मी याबद्दल खूप उत्सुक आहे. आता हा नवा प्रवास कसा असेल याची मलाही उत्सुकता आहे”
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. ८० पैकी ८० जागा जिंकण्याचा भाजपा या निवडणुकीत प्रयत्न करताना दिसत आहे. दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेत श्री रामाची भूमिका साकारणारा अभिनेता अरुण गोविल यांनी मेरठ लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यावेळी गोविल यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यही उपस्थित होते. अरुण गोविल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजप उत्तर प्रदेशातील सर्व ८० जागा आणि संपूर्ण देशातील ४०० जागा जिंकण्याचे लक्ष्य गाठेल, असा कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये आज प्रचंड आत्मविश्वास आहे असे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले.