इराण पुढील ४८ तासांमध्ये इस्त्राईलवर हल्ला करण्याची शक्यता आहे. याबाबतची शक्यता वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका स्पेशल रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. इराण इस्त्राईलच्या दक्षिणी भागात हल्ला करण्याची शक्यता असल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. अहवालात एका व्यक्तीचा उल्लेख आहे ज्याला इराणच्या राजवटीच्या नेतृत्वाच्या वतीने माहिती देण्यात आली होती. दरम्यान परराष्ट्र खात्याने देखील इराण आणि इस्त्राईल यामधील भारतीय नागरिकांसाठी निर्देश जारी केले आहेत. इराण-इस्त्राईलचा प्रवेश टाळा आणि भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या तणावाच्या परिस्थितीमध्ये एअर इंडिया फ्लाईट्सने एक मोठा निर्णय घेतला आहे.
इराण आणि इस्त्राईलमध्ये असणाऱ्या युद्धजन्य तणावामुळे एअर इंडिया कंपनीने युरोपला जाणाऱ्या फ्लाईट्स इराणच्या हवाई क्षेत्रातून न नेण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणास्तव पश्चिम युरोपला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानांना आणखी २ तासांचा कालावधी लागू शकतो, कारण युरोपला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानांनी इराणची हवाई हद्द टाळण्यासाठी मोठा मार्ग स्वीकारला आहे, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.
सीरियाची राजधानी दश्मिक येथील इराण दूतावासाच्या इमारतीवर इस्रायलच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूनंतर इराण बदलाच्या आगीत होरपळत आहे. इराण-इस्रायलवर हल्ला करण्याची पूर्ण तयारी. इराणने आधीच सूडाची घोषणा केली आहे. पुढच्या ४८ तासांमध्ये इराणकडून इस्त्रायलवर मोठा हल्ला होऊ शकतो असं वृत्त अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने त्याच्या एका विशेष रिपोर्टमध्ये दिले आहे. या आधी इराणने इस्त्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. इराणी दूतावासावर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये इराणच्या सुरक्षा रक्षक आणि अधिकारी मारले गेले.