इराण पुढील ४८ तासांमध्ये इस्त्राईलवर हल्ला करण्याची शक्यता आहे. याबाबतची शक्यता वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका स्पेशल रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. इराण इस्त्राईलच्या दक्षिणी भागात हल्ला करण्याची शक्यता असल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. अहवालात एका व्यक्तीचा उल्लेख आहे ज्याला इराणच्या राजवटीच्या नेतृत्वाच्या वतीने माहिती देण्यात आली होती. इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धादरम्यान हिजबुल्लाहने शुक्रवारी इस्रायलवर मोठा हल्ला केला आहे. हिजबुल्लाह या अतिरेकी संघटनेने गॅलीलीच्या उत्तरेकडील प्रदेशावर एकाच वेळी ४० हून अधिक रॉकेट डागले आणि या रॉकेट हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.
लेबनॉनमधील इराणच्या हिजबुल्लाहने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी उत्तर इस्रायलमधील इस्रायली सैन्याच्या तोफखान्याला लक्ष्य करून डझनभर रॉकेट डागले आहेत. इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) रॉकेट हल्ल्याची पुष्टी केली असून कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगितले आहे. आयडीएफ वॉर रूमने या हल्ल्याचा व्हिडिओही जारी केला आहे. दुसरीकडे, लेबनॉनमध्ये झालेल्या रॉकेट हल्ल्यानंतर अमेरिका अधिक सतर्क झाली आहे. इराणच्या हल्ल्याच्या भीतीने अमेरिका मध्यपूर्वेत अतिरिक्त सैन्य पाठवत असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्याने म्हटले आहे.
लेबनॉनमधून उत्तर इस्रायलमध्ये सुमारे ४० रॉकेट डागण्यात आले, आयडीएफने सांगितले की, त्यातील काही आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टमद्वारे नष्ट करण्यात आले तर काही मोकळ्या भागात प्रभावित झाले किंवा लेबनॉनमध्ये पडले. घटनेदरम्यान सायरन वाजत होते. यापूर्वी, आयडीएफने म्हटले होते की हवाई संरक्षणाने उत्तर इस्रायलमध्ये हिजबुल्लाहने सुरू केलेले दोन स्फोटकांनी भरलेले ड्रोन पाडले होते.