ऑस्ट्रेलियात सिडनी येथे एका मॉलवर भीषण दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्या इथे गोंधळाची स्थिती असून नेमकं चित्र अजून स्पष्ट झालेले नाही. लोकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकल्याच स्थानिक लोकांच म्हणणे आहे.
आज दुपारी सिडनीच्या पूर्व उपनगरातील एका मॉलमध्ये एका व्यक्तीने घुसून यादृच्छिकपणे गोळीबार आणि लोकांना चाकू मारण्यास सुरुवात केल्याने किमान चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.मात्र मिळालेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर होते. त्यात एकाला मारण्यात आले असून दुसऱ्याचा शोध सुरु असल्याचे वृत्त समोर आले आहे. .
सिडनी पोलिसांच्या मते हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले जात. आहे. हल्ल्यानंतर मॉलमध्ये एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. लोक आपले प्राण वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हजारो लोकांना मॉलमधून बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
साउथ वेल्स पोलिसांच्या म्हणण्यानुसार , हल्ला विशाल वेस्टफील्ड बॉन्डी जंक्शन मॉल परिसरात झाला आहे. आज दुपारी खरेदीसाठी हा मॉल खच्चून भरलेला होता. सध्या मॉल बंद करण्यात आला आहे. पोलिसांनी लोकांना या क्षेत्रापासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे.