2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तयारीदरम्यान उत्तराखंडमधील रुरकी येथे एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) येथे एका जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी आले होते, तिथे त्यांना त्यांच्यासारखा दिसणारा एक लहान मुलगा भेटला. मुलाने अगदी योगी आदित्यनाथ यांच्यासारखे भगवे कपडे परिधान केले होते आणि त्याचे केस खूपच लहान केले होते.
हे दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित झाले. योगी आदित्यनाथ यांच्या वेशात आणि पोशाखात मुलाचे साम्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. योगी आदित्यनाथ देखील मुलाला पाहून हसले, तसेच त्याला जवळ बोलावले आणि त्याच्याशी संवाद साधला.
https://twitter.com/ANI/status/1779460536196808770
या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मुलाच्या उत्साहाचे आणि योगी आदित्यनाथ यांच्या आपुलकीचे लोक कौतुक करत आहेत. योगी आदित्यनाथ मुलांमध्येही किती लोकप्रिय आहेत, हे या प्रसंगाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हा प्रसंग 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा आहे, त्यामुळे ही अनोखी भेट राजकीय वर्तुळात कशी चर्चेचा विषय ठरते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.