दिल्ली कोर्टाने आज बीआरएसच्या नेत्या के कविता यांना पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.दिल्लीच्या कथित दारू घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या के. कविता यांना २३ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सीबीआयने के. कविता यांची सीबीआय कोठडी संपल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर केले होते.
के कविता यांच्या इडी कोठडी संपल्यानंतर त्यांना ११ एप्रिलला सीबीआयने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना १५ एप्रिल पर्यंत के कविता यांना CBI कोठडी सुनावली होती. ही मुदत संपल्यानंतर न्यायालयाने आजच्या सुनावणीदरम्यान दिल्ली कोर्टाने के कविता यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.
के कविता या तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत. सक्तवसुली संचालयाने के कविता यांना अटक केली होती. त्यानंतर सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले होते. सीबीआयच्या म्हणण्या नुसार, के कविता यांनी मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणात कट रचणाऱ्यांमध्ये प्रमुख भूमिका बजावली आहे. त्यांच्याविरोधात तसे काही पुरावे आढळून आले आहेत.
दरम्यान सुनावणीच्या वेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना कविता यांनी भाजपवर टीका केली आहे. “ही सीबीआयची कस्टडी नाही, तर भाजपची कस्टडी आहे. भाजप जे काही बाहेर बोलते तेच सीबीआय मला आतमध्ये विचारत आहे”.असे म्हणाल्या आहेत.