K Kavitha : बीआरएसच्या नेत्या के कविता (K Kavitha) यांना मोठा धक्का बसला आहे. कारण दिल्ली कोर्टाने (Delhi Court) त्यांच्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) वाढ केली आहे. त्यामुळे के कविता यांना दिलासा मिळालेला नाहीये.
के कविता यांना दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. तर सीबीआयने याआधी के कविता यांना 15 एप्रिलपर्यंत कोठडीत ठेवले होते. मात्र, आजच्या सुनावणीदरम्यान के कविता यांना दिल्ली कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. कोर्टाने आता त्यांना 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
या सुनावणीनंतर के कविता यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर टीका केली. ही सीबीआयची कस्टडी नसून ही भाजपची कस्टडी आहे. कारण भाजप जे काही बोलते तेच सीबीआय मला आतमध्ये विचारत आहे. मला गेल्या दोन वर्षांपासून तेच तेच प्रश्न विचारले जात आहेत, नवीन काही नाही, असं के कविता म्हणाल्या.