अभिनेता रणवीर सिंहने (Ranveer Singh) सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी आणि देशातील सर्वात जुने तीर्थक्षेत्र वाराणसीच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जोरदार प्रशंसा केली. रणवीर सिंह आणि बॉलीवूड ब्यूटी क्रिती सॅनन (Kriti Sanon) रविवारी (14 एप्रिल) प्राचीन मंदिर शहरात होते, जे डिझायनर मनीष मल्होत्राच्या (Manish Malhotra) फॅशन शोसाठी शोस्टॉपर्स बनले होते.
रविवारी एएनआयशी बोलताना रणवीर म्हणाला, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (वाराणसीच्या) विणकर समुदायाचे संरक्षण आणि प्रचार करण्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीचे आम्ही मनापासून कौतुक करतो. त्यांनी गेल्या 10 वर्षांत काशीचा चेहरा पूर्णपणे बदलून टाकला आहे.”
मनीष मल्होत्राचा शो ज्याची थीम ‘बनारसी साड्या – भारतीय संस्कृती आणि कारागिरांची टेपेस्ट्री’ अशी होती, याबाबत बोलताना रणवीर सिंह म्हणाला, “हा कार्यक्रम अप्रतिम होता. गंगा नदीच्या काठावर रॅम्प वॉक करण्याचा अनुभव भारी होता. मुंबईतील 5-स्टार मेजवानीत फिरण्यापेक्षा हे खूप चांगले आहे. या कार्यक्रमाने आमच्या विणकाम समुदायाच्या उत्कृष्ट कारागिरीचे प्रदर्शन केले.”
आधुनिक ट्रेंड आणि पद्धतींशी जुळवून घेत तरुणांना देशाच्या वारशाबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन करून, रणवीर सिंह म्हणाला, “आपल्या देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगणे खूप महत्वाचे आहे. हा महिना खूप महत्त्वाचा आहे. तुमची जबाबदारी नजरेआड करू नका तुम्हीच भारताचे भविष्य आहात, बाहेर जा आणि मतदान करा, असे आवाहन रणवीर सिंहने केले.
पुढे मनीष मल्होत्रा म्हणाला की, मी वाराणसीला अनेकदा गेलो आहे आणि मला हे शहर आवडते. तसेच मी काशीला अनेकदा भेट दिली आहे आणि मला इथे यायला खूप आवडते.”
“मी इथल्या विणकरांना याआधी भेटलो होतो, पण वाराणसीमध्ये फॅशन शो आयोजित करण्याचा विचार कधीच केला नव्हता. अनेक वर्षे काम करून आणि अगणित फॅशन शो आयोजित केल्यानंतरही आजचा कार्यक्रम अप्रतिम होता. मी बॅकस्टेजवर खूप घाबरलो होतो,” असेही मनीष मल्होत्रा म्हणाला.
फॅशन शो कशामुळे इतरांपेक्षा वेगळा ठरला याबद्दल मल्होत्रा म्हणाला, “साधारणपणे, मी डिझाइन केलेले कपडे भरतकाम आणि सिक्विनने भरलेले असतात, परंतु आज त्यांचे लक्ष त्यांच्याकडे नाही तर काशीच्या विणकरांच्या कारागिरीवर होते. मी नेहमीच प्रयत्न केला आहे, भारताची स्थानिक कलाकुसर जगासमोर नेण्यासाठी आणि भविष्यातही असेच करत राहू, असेही मल्होत्रा म्हणाला.
दरम्यान, मनीष मल्होत्राचा फॅशन शो वाराणसीच्या हस्तकला आणि हातमागांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन मायनॉरिटीज फाउंडेशनने आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यक्रमाचा भाग होता. हा कार्यक्रम नमो घाटावर पार पडला.